|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिबंदी

महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिबंदी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

त्राज्यात आजपासून (23 जून) प्लास्टिक बंद होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काल पार पडलेल्या आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आजपासून तुम्ही प्लास्टिक वापरल्यास पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱयांबरोबरच सर्वसामान्यांकडून या निर्णयावर टीकाही होत आहे.

उच्च न्यायालयानेही प्लास्टिकबंदीबाबत व्यापाऱयांना कुठलाही दिलासा दिला नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशाबाबत दाद मागण्यासाठी तीन आठवड्याचा अवधीही उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच, 20 जुलैला अंतिम सुनावणीची तारिख ठरवली जाईल, असेही उच्च न्यायालयाने सांगितलं.मुंबईत येणार प्लास्टिक हे गुजरातमधून येतं. गुजरातमधील लोक प्लास्टिकचे व्यापारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दवाब येण्याची शक्मयता होती, असे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

मुंबईत काल प्लास्टिकला पर्यायी वस्तूचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. या कार्यक्रमाला युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची उपस्थिती होती. वरळीतल्या एनएससीआय स्टेडियवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

 

 

Related posts: