|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन रद्द करा आमदार क्षीरसागर यांच्याकडे मागणी

रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन रद्द करा आमदार क्षीरसागर यांच्याकडे मागणी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रिक्षा भाडेवाढ रद्द करा, मीटर रिकॅलिब्रेशन रद्द करा, या मागणीचे निवेदन शहरातील रिक्षा व्यावसायिक संघटनांनी रविवारी आमदार राजेश क्षीरसागर यांना दिले.

 राज्य शासनाने रिक्षा मीटरमध्ये भाडेवाढ केली आहे. व्यावसायिकांना रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन परवडत नाही. त्यामुळे ते रद्द करावे. किंवा कमीत कमी दरात रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन घ्यावे, जुन्या पध्दतीने मीटर टेरीफ कार्ड मंजूर करावे, या मागण्या निवेदनात केल्या आहेत. न्यू करवीर ऍटो रिक्षा युनियन, शाहू रिक्षा मंडळाच्या पदाधिकाऱयांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना निवेदन दिले. यावेळी राजेंद्र थोरावडे, महादेव विभुते, नंदू सुतार, जहीरअली सैय्यद, सलीम अकिवाटे, गजानन नाकील आदी उपस्थित होते.  

 

 

Related posts: