|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » प्लिसकोव्हाला पराभवाचा धक्का

प्लिसकोव्हाला पराभवाचा धक्का 

वृत्तसंस्था/ इस्टबोर्न

येथे सुरू असलेल्या इस्टबोर्न ग्रासकोर्ट महिलांच्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी बेलारूसच्या सॅबेलिनेकाने झेकच्या माजी विजेत्या कॅरोलिना प्लिसकोव्हाला पराभवाचा धक्का दिला.

या सामन्यात सॅबेलिनेकाने प्लिसकोव्हाचा 6-3, 2-6, 7-6 (7-5) असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. पोलंडची रॅडव्हेन्स्का आणि सॅबेलिनेका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. रॅडव्हेन्स्काने लॅटव्हियाच्या ओस्टापेंकोचा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. रॅडव्हेन्स्काने क्विटोव्हावर 6-2, 7-5 अशी मात केली. डेन्मार्कच्या कॅरोलिनी वोझ्नियाकी हिने उपांत्यफेरी गाठताना ऑस्ट्रेलियाच्या बार्टीवर 6-4, 6-3 अशी मात केली. जर्मनीच्या केरर्बरने शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवितांना रशियाच्या कॅसेटकिनाचा 6-1, 6-7 (3-7), 7-6 (7-3) असा पराभव केला.

या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात इटलीच्या मार्को सिकेहिनेटोने ऑस्ट्रेलियाच्या मिलमनचा 5-7, 6-3, 6-2, जर्मनीच्या मिश्चा व्हेरेव्हने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. कझाकस्थानच्या कुकुशिखीनने ब्रिटनच्या एडमंडचा 5-7, 6-3, 6-1 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.

Related posts: