|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार : हवामान विभाग

आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार : हवामान विभाग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे.मुंबईतल्या दादर, लालबाग, परळ, वांद्रे,मुलुंड,कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पावसाचा जोर पहायला मिळत आहे.

दरम्यान, या आठवडय़ाच्या सुरूवातीपासून जोर धरलेल्या पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी पावसाने सुरू केलेली बॅटिंग सुरूच आहे. हवामान खात्याचे तज्ञ अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनूसार मान्सून या आठवडय़ात सक्रीय राहणार असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.