|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन

प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने मित्राचा खुन 

ऑनलाईन टीम / पुणे :

प्रेयसीच्या घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्याने चिडून तिघा जणांनी मित्राच्या गळय़ावर बियरची बाटली खूपसून खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोथरुडमधील कलाग्राम सोसायटीत पहाटे 4 वाजता घडली आहे.

खुन झालेल्या तरूणाचे नाव अक्षय जोरी असे आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सुशांत ओंबळे, प्रशांत ओंबाळे व सागर मेस्त्री यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत ओंबाळे आणि अक्षय जोरी हे मित्र होते. दोन वर्षापूर्वी सुशांत याच्या प्रेमप्रकरणाची माहिती अक्षयने प्रेयसीच्या घरी सांगितली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा त्याच कारणावरून ते व त्याचे मित्र कलाग्राम सोसायटी येथे दारूची पार्टी करत असताना त्यांच्यात वाद झाला. तेव्हा सुशांत ओंबाळे याला त्याचे घरी सोडले. त्यानंतर तिघांनी मिळून संगनमत करुन ते पुन्हा पहाटे चार वाजता कलाग्राम सोसायटीत आले. त्यावेळी सुशांत याने बियरची बाटली फोडली व अक्षयच्या गळय़ाजवळ खुपसली. त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला. कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अधिक तपास करीत आहेत.