|Saturday, October 19, 2019
You are here: Home » उद्योग » आजारपणात रेल्वे देणार मोफत प्रवासाची सुविधा

आजारपणात रेल्वे देणार मोफत प्रवासाची सुविधा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेकडून काही ठराविक आजारपण असणाऱया लोकांकरिता रेल्वे प्रवासात सुविधा देणार आहे. या प्रवर्गात मोडणाऱया नागरिकांमध्ये 13 प्रकारच्या लोकांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

या सवलतीत वयोवृध्द, दिव्यांग आणि काही विशेष आजारपण असणाऱयांचा समावेश या सूचीत करण्यात येणार आहे. आजारपण असणाऱया रुग्णाला तातडीने एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणावर घेऊन जाण्याकरिता कमीत कमी वेळेत इलाज करता यावा यांच्यासाठी प्रवासाकरिता तिकीट मोफत आणि रुग्णसोबत जाणाऱयाला तिकीटात सवलत देण्यात येणार आहे.

कॅन्सर, थॅलेसिमा, किडनीचे रोग या सारख्या आजाराची नोंद या प्रवासातील सवलीमध्ये नोंद करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.