|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Top News » कोल्हापूरात बस अपघातात एकाचा मृत्यू तर 15 जखमी

कोल्हापूरात बस अपघातात एकाचा मृत्यू तर 15 जखमी 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

कोल्हापूरात शिरोळ तालुक्यात खसगासगी बसचा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 महिला जखमी झाल्या आहेत. गणेश बेकरीची ही बस असून ही बस कर्मचाऱयांना घेऊन जात होती.

 

गुरुवारी सकाळी गणेश बेकरीची बस कर्मचाऱयांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली. बसमध्ये एकूण 40 जण होते. सर्व जण गणेश बेकरीत कामाला जात होते. कुरुंदवाडीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेले अरुंद पुल ओलांडताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली आणि बस उलटली. या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड (वय 28) या तरुणाचा मृत्यू झाला. तर बसमधील 15 महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस सुरज लकडे यांची असून त्यांनी ही बस भाडेतत्त्वावर दिली होती. दत्ता बले हे या बसचे चालक होते.

 

Related posts: