|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » भाजप पुन्हा जिंकल्यास भारत ‘हिंदू पाकिस्तान’ बनेल : शशी थरूर

भाजप पुन्हा जिंकल्यास भारत ‘हिंदू पाकिस्तान’ बनेल : शशी थरूर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

’2019 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्यास भारताचा ’हिंदू पाकिस्तान’ होईल, असा इशारा काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दिला आहे. थरूर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतानाच या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. येथील एका कार्यक्रमात थरूर यांनी हे विधान केलं.

 

’भाजप 2019ची लोकसभा निवडणूक जिंकल्यास आपलं लोकशाही प्रदान करणारं संविधान संपुष्टात आणलं जाईल. भाजप नवं संविधान निर्माण करेल. त्यामुळे भारताची पाकिस्तान सारखी स्थिती होईल. त्यांचं संविधान हिंदू राष्ट्रावर आधारीत असेल. त्यात अल्पसंख्यांकाचे अधिकार डावलले जातील. हा देश ’हिंदू पाकिस्तान’ बनेल,’ असा इशारा देतानाच ’असा देश निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती,’ असं शशी थरूर म्हणाले.

 

Related posts: