|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » दोन विमानांची टक्कर टळली, 330 प्रवासी सुखरूप

दोन विमानांची टक्कर टळली, 330 प्रवासी सुखरूप 

ऑनलाईन टीम / नागपूर :

जवळपास 330 प्रवाशी असलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांची टक्कर थोडक्मयात टळली. अवकाशातील बंगळुरु हवाई क्षेत्रात आज ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱयांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कोईम्बतूर-हैदराबाद आणि बंगळुरू-कोचीन असा प्रवास या विमानांकडून करण्यात येत होता.

इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हैदराबादकडे निघालेल्या विमानात 162 प्रवासी होती. तर दुसऱया विमानातून 166 प्रवासी प्रवास करत होते. बंगळुरू हवाई क्षेत्रात केवळ 200 फूट अंतरावरांनी या विमानांची टक्कर टळली. दरम्यान, यावेळी विमानांचा अपघात टाळणारी यंत्रणा बंद होती.

 

Related posts: