|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चारित्र्य हेच भूषण

चारित्र्य हेच भूषण 

सुभाषित- ऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता शौर्यस्य वाक्मसंयमो

ज्ञानस्योपशमः श्रुतस्य विनयो वित्तस्य पात्रे व्ययः ।

अक्रोधस्तपसः क्षमा प्रभवितुर्धर्मस्य निर्व्याजता

सर्वेषामपि सर्वकारणमिदं शीलं परं भूषणम् ।।

 

अन्वय- ऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता (अस्ति) शौर्यस्य

(च) वाक्संयमः, ज्ञानस्य (विभूषणम्) उपशमः

श्रुतस्य विनयः पात्रे व्ययः वित्तस्य (विभूषणम्)

तपसः अक्रोधः प्रभवितुः क्षमा (तया च

धर्मस्य निर्व्याजता (विभूषणम्) अस्ति । (किंतु)

सर्वेषाम् अपि) (एतेषां) सर्वकारणम् इदं

शीलं परं भूषणम् अस्ति ।

अनुवाद- सज्जनपणा हे श्रीमंताचे भूषण आहे तर बोलण्यावर ताबा असणे हे शौर्याचे भूषण आहे. शांती हे ज्ञानाचे तर नम्रता हे विद्वत्तेचे भूषण आहे. सत्पात्री (दान करण्यात) खर्च होणे हे संपत्तीचे भूषण तर क्रोधरहित असणे हे तपश्चर्येचे भूषण आहे. दांभिकपणा नसणे हे धर्माचे भूषण आहे, परंतु या सर्वांचे सर्वार्थाने कारण असणारे शील (स्वभाव, चारित्र्य) हे सर्वश्रे÷ भूषण आहे.

विवेचन- शील हे सर्व सद्गुणांचे मूल कारण आहे असे सुभाषितकार म्हणतो. पण हे शील म्हणजे काय? क्षमाशील वगैरे शब्दात ‘शील’चा अर्थ स्वभाव असा आहे, तर सत्शील, शीलवान इत्यादी शब्दांमध्ये तो ‘चारित्र्य’ अशा अर्थाने आला आहे. आणि तोच मुख्य अर्थ आहे. कारण सौजन्य संयम, शांती, नम्रता, निष्कपटपणा, इत्यादी सद्गुण हे चारित्र्यसंपन्नतेमुळेच प्राप्त होतात. पैसेवाले लोक सुजन असतातच असे नाही तसेच शूर व्यक्ती मितभाषी असण्यापेक्षा बढाईखोर असण्याची अधिक शक्मयता असते. त्यामुळेच म्हटले आहे की सुजनता हे श्रीमंतीचे भूषण, वाणीचा संयम हे शौर्याचे भूषण आहे. ज्ञानी माणूस उथळ नसावा तसेच विद्वान बहुश्रुत व्यक्ती उद्धट नसावी, तरच शोभते (विद्या विनयेन शोभते) संपत्ती असेल तर ती उधळमाधळ करण्यापेक्षा सत्पात्री दान केली तरच शोभते. तपस्वी माणसाला रागीटपणा शोभत नाही त्याचप्रमाणे धर्मनि÷ माणूस दांभिकपणा करीत नसेल तरच ते शोभते. परंतु या सर्व गोष्टी शोभण्यासाठी आवश्यक जे सद्गुण आत्ता सांगितले ते माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतात. आणि ही स्वभाव जितका ऋजु सरळ असेल तितकी ती व्यक्ती अधिक चारित्र्यवान बनू शकते. त्यामुळेच या सर्वांचे कारण असलेले शील हेच श्रे÷ भूषण आहे. असे सुभाषितकाराने सयुक्तिकपणे सांगितले आहे.

Related posts: