|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूलमध्ये ‘एसएससी मित्र’ चे स्वागत

प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूलमध्ये ‘एसएससी मित्र’ चे स्वागत 

वार्ताहर /सिध्दनेर्ली “

सिध्दनेर्ली ता. कागल येथील प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूलमध्ये ‘दै. तरुण भारत’ च्या ‘एसएससी मित्र’ पुस्तिकेचे प्रकाशन मुख्याध्यापिका सुनंदा पोवार यांच्या हस्ते  करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सुनंदा पोवार म्हणाल्या, यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे ‘दै. तरुण भारत’ ने विद्यार्थ्यांचा विचार करुन यावर्षीही बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ‘ एसएससी मित्र’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. याचा फायदा दहावीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. अभ्यासक्रम बदलल्यामुळे यावर्षी या पुस्तिकेचा विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही उपयोग होणार आहे.

याप्रसंगी दहावी वर्गशिक्षक अरविंद मगदूम, भाऊसाहेब लाड , मोहन, नलवडे, विजयश्री तेलवेकर, रमेश पाटील, सरोजा पाटील, रमेश कांबळे आदी शिक्षकांसह दहावीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts: