|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुलभूषण प्रकरणी पाकचे दुसरे प्रतिज्ञापत्र 17 रोजी

कुलभूषण प्रकरणी पाकचे दुसरे प्रतिज्ञापत्र 17 रोजी 

इस्लामाबाद / वृत्तसंस्था :

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी 17 जुलै रोजी पाकिस्तानात स्वतःचे दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाक सैन्य न्यायालयाने जाधव यांना मृत्यूदंड सुनावला होता. याप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 23 जानेवारी रोजी पाकिस्तानला दुसऱया टप्प्यातील प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा निर्देश दिला होता. 17 एप्रिल रोजी भारताने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्याच्या उत्तरादाखल पाकिस्तानकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे. भारताच्या याचिकेवर सुनावणी करत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

 

 

Related posts: