|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱयाला छात्राचिकाराने बदडले

अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱयाला छात्राचिकाराने बदडले 

 इस्तंबूल :

तुर्कस्तानात 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी विवाह करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱया व्यक्तीला बदडणारा वेडिंग फोटोग्राफर (छायाचित्रकार) ओनुर अल्बायराक याला नायकाचा दर्जा दिला जात आहे. तो तुर्कस्तानच्या मलाटय़ा प्रांताचा रहिवासी आहे.

काही दिवसांपूर्वी ओनुरला एका विवाहाच्या छायाचित्रणासाठी बोलाविण्यात आले होते. या विवाहात नवरा प्रौढ तर वधू अल्पवयीन होती. विवाहापूर्वी ती भेदरलेल्या स्थितीत असल्याचे पाहून ओनुरने छायाचित्रण करण्यास नकार देत विवाह रोखण्याची मागणी केली. यावेळी त्याचा संबंधित वरासोबत वाद झाला. दोघांदरम्यान मारहाण देखील झाली, ज्यात ओनुरने वराच्या नाकाला ठोसा लगावला.

ही घटना समाजमाध्यमांमध्ये समोर आल्यानंतर ओनुरचे चहोबाजूने कौतुक होत आहे. ओनुरनुसार संबंधित वराने वधूच्या वयाचा उल्लेख केला नव्हता. तुर्कस्तानात विवाहाचे किमान वय 18 वर्षे आहे.

Related posts: