|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाहतुकीबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे

वाहतुकीबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे 

वार्ताहर /बारामती :

नागरिकांना शहरात फिरायचे असल्यास ? वाहन शहराबाहेर ठेवून पायी या.. भाजी खरेदीसाठी बाजारात जायचे असेल, तर वाहन आणू नका.. बेशिस्त वाहतूकीमुळे बारामतीकर हैराण झाले आहेत. शहरात फिरता येण्याजोगी स्थिती राहिलेली नाही. यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. अधूनमधून थोडीफार शिस्त आणण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जातोय. परंतु ती कारवाई दिख्यापुरतीच असते. वाहतूक पोलीस मारल्यासारखे करतात आणि वाहनचालक, रिक्षाचालक, रडल्यासारखे करतात. डाय्रया भरतात, दंड होतो. पुन्हा बेकायदा वाहतूक करण्यास मोकळे ! नागरिकांनी मनात आणले तर, हा प्रश्न सुटेल. मात्र, त्यासाठी स्वयंशिस्तीचा धडा गिरवायला लावणे गरजेचे आहे. म्हणून पोलीस आणि नगरपालिकेशी नागरिकांना भांडता येईल. सध्या शहराची वाढचाल मोठी होत आहे. सर्व बाजूंनी शहर वाढू लागले आहे. बाजारपेठाही शहरात सर्वञ पसरु लागल्या असल्याचे चिञ पाहावास मिळत आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढत असून वर्दळ ही वाढू लागली आहे. बेशिस्त वाहनांना आवर घालण्यास वाहतूक पोलीस कमी पडत आहेत.

तीन हत्ती, चौक, भिगवण चौक, महात्मा गांधी शाळेसमोरील परिसर, एसटी स्टँन्ड, इंदापूर चौक, गुणवडी चौक, पानगल्ली, परिसरात कमालीची बेशिस्त वाहतूक सर्रास सुरू असते. त्यामध्ये प्रामुख्याने रिक्षा, दुचाकी, चारचाकी, स्टार बसेस, यांचा प्रामुख्याने समावेश आहे.बारामतीचे रिक्षावाले त्यांच्या स्टाईलने गाडी चालवण्यात अगोदरच महान आहेत. रिक्षात प्रवाशांना जनावर ज्या पध्दतीने कोंबतात त्याप्रमाणे  कोंबून मोठय़ा आवाजात टेपवर गाणे लावून रिक्षावाले प्रवाशांना पळत असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. सध्या बारामतीचा परिसर वाढल्याने प्रवाशांना दमबाजी, लुटण्याचे प्रकारही अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. बारामती एस टी स्थानकात कशा ही पध्दतीने रिक्षा, टेम्पो, दुचाकी, चारचारी, गाडय़ा आडव्या-तिडव्या लावलेल्या असतात. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाया वाहनांचाही सुळसुळाट याठिकाणी अधिक दिसून येत आहे. सध्या शाळेचे दिवस असल्याने शालेय विघार्धी रस्यावरुन येत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पालक सांगतात. त्यामुळे बारामतीची वाहतुक व्यवस्था ही दिख्याव्यापुरती नकोय.त्यासाठी पोलिस यंञणेणे व पालिकेने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

Related posts: