|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » देशसेवेसाठी अनेक जण प्रवृत्त होतील

देशसेवेसाठी अनेक जण प्रवृत्त होतील 

वार्ताहर /केळघर :

जावळी तालुक्यातील घरातघर येथील हुतात्मा जवान नवनाथ सुरवे यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी बलिदान देणाऱया वीर जवानांचा इतिहास युवापीढीसाठी मागर्दशर्क ठरावा म्हणून केंद्र शासनाने हुतात्मा जवानांची प्रतिमा व जीवनपट त्यांच्या जन्मगावी लावण्याचा निणर्य घेतला असून यामुळे विद्याथ्यार्नां व युवकांना  हुतात्मांच्या बलिदानाची आठवण दीघर्काळ राहून देशसेवेसाठी अनेक जण प्रवृत्त होतील, असा विश्वास जावळी पंचायत समितीचे गटविकास आधिकारी संताजी पाटील यांनी व्यक्त केला.

  घरातघर येथील हुतात्मा नवनाथ कोंडिबा सुरवे हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात  1989 मध्ये नियुक्त झाले होते.छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे कतर्व्य बजावत असताना 2006 मध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांत त्यांना वीरमरण आले होते.वीर जवानांच्या शौयार्चे स्मरण राहावे म्हणून केंद्र सरकारच्या वतीने वीर हुतात्मा जवानांच्या मूळ गावी प्रतिमा व जीवनपट (कोनशीला) बसवण्याचा निणर्य घेतला आहे. त्यानुसार घरातघर येथे केंद्रीय  औद्योगिक सुरक्षा दलाचे सहायक आयुक्त मलकीत सिंह यांच्या मागर्दशर्नाखाली हवालदार संजय मोरे यांनी सवर् ग्रामस्थांच्या सहकायार्ने हे काम पूणर् केले असून  प्राथमिक शाळेच्या आवारात कोनशिला अनावरण प्रसंगी आयोजित कायर्क्रमात ते बोलत होते.याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने,गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, केंद्रप्रमुख छाया खंडजोडे,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे हवालदार संजय मोरे,सरपंच लक्ष्मी चिकणे,ग्रामसेवक बी.सी.इंगळे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सुरवे,मुख्याध्यापिका सुप्रिया गोळे,पोलीस पाटील ललिता चिकणे, हुतात्मा सुरवे यांच्या कुटुंबियांची, ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.

Related posts: