|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगावच्या सब -रजिस्ट्रार अधिकाऱयाला घेराव

मडगावच्या सब -रजिस्ट्रार अधिकाऱयाला घेराव 

प्रतिनिधी /मडगाव :

जन्म दाखला देण्यासाठी 4-5  महिन्याचा प्रमाणाबाहेर विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी मडगावात सासष्टी सब- रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकाऱयाला घेराव घालून कडक शब्दात जाब विचारला.

शैक्षणिक वर्षात अनेक विद्यार्थ्याना तसेच विदेशात जाऊ पाहणाऱया अनेकांना जन्म दाखल्याची गरज असते. मात्र जन्म दाखल्यासाठी वेळकाढू धोरणाचा कळस झाल्याचे पाहून प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, काँग्रेस प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव, फातोर्डा गट काँग्रेस अध्यक्ष पियेदाद नोरोन्हा व अन्य कार्यकर्त्यानी सब- रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकाऱयाला घेराव घातला आणि जन्म दाखला मिळविण्यासाठी होत असलेल्या विलंबाबद्दल कडक शब्दात जाब विचारला आणि जनतेच्या प्रभावी भावना प्रशासनाच्या कानावर घातल्या.

अपुरा कर्मचारी वर्ग

यावेळी घेराव घालणाऱया कार्यकर्त्यांना उत्तर देताना या कार्यालयातील या अधिकाऱयांने ‘सध्या फक्त दोनच कर्मचारी जन्म दाखला देण्याचे काम पाहात आहेत. कर्मचारी अपुरे असल्याची आपण वरिष्ठांनी कल्पना दिलेली असून येत्या सोमवारपर्यंत या कार्यालयाला ज्यादा कर्मचारी देण्याची मागणी केल्याचे’ सांगितले.

Related posts: