|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 18 रोजी दिल्लीत चर्चा

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 18 रोजी दिल्लीत चर्चा 

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि निगम-महामंडळांवरील अध्यक्ष नेमणुकीवरून निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी राज्य काँग्रेस नेते येत्या 18 जुलै रोजी नवी दिल्ली येथे हायकमांडशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे युती सरकारमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कावेरी नदीच्या पाणी वाटपासंबंधी नवी दिल्लीत खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री डी. के. शिवकुमार आणि आपण दिल्लीला जाणार आहे. यावेळी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात येणार आहे, असे पमरेश्वर यांनी सांगितले.

सरकार स्थापनेनंतर काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आमदार मंत्रिपदापासून वंचित राहिले होते. सध्या मंत्रिमंडळात सहा मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यामुळे या जागांसाठी पक्षातून अनेक इच्छुकांमध्ये चढाओढ निर्मण झाली आहे. प्रभावी असणाऱयांनाच मंत्रिपद दिले जाणार आहे. तर उर्वरितांना निगम-महामंडळांवर अध्यक्षपद देऊन संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

निगम-महामंडळांवरील अध्यक्षपदांची निजद आणि काँग्रेससने वाटाघाटी केल्या आहेत. कॉँग्रेसच्या वाटय़ाला 50 हून अधिक निगम-महामंडळांची अध्यक्षपदे आली आहेत. 50 पैकी 30 निगम-महामंडळांवर काँग्रेस कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहेत.

Related posts: