|Friday, February 28, 2020
You are here: Home » उद्योग » ट्रक वाहतूक संपामुळे आंतरराज्य व्यापारात 60 टक्क्यांची घट

ट्रक वाहतूक संपामुळे आंतरराज्य व्यापारात 60 टक्क्यांची घट 

नवी दिल्ली

 व्यापार वाहतूक ट्रक मालकांनी पुकारलेल्या संपामुळे व्यापार क्षेत्रातील उलाढाल ठप्प झाली आहे. व्यापार इंडस्ट्रीजच्या क्षेत्रावर यांचा संपूर्ण परिणाम दिसून आला आहे. एका राज्यातून दुसऱया राज्यात यांचे बदल पहावयास मिळाले असून देशातील 80 टक्के ट्रक रस्त्यावर धावण्याचे बंद झाले असल्याची माहिती बंद पुकारण्यात आलेल्या संघटनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रक वाहतूक संप करणारे आणि शासन यांच्यामध्ये अजून चर्चा चालू असून त्यातूत कोणताही ठोस मार्ग समोर आला नाही. दिल्लीच्या गुड्स ट्रान्सपोर्ट संघटनेकडून अंतरराज्य माल वाहतूकीमध्ये 60 ते 70 टक्क्यांची घसरण झाल्याची माहिती गुड्स ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपूर यांनी दिली आहे. कच्च्या मालाचा पुरवठय़ात घट दिसून आली आहे. तर राज्यमहामार्गामध्ये टोल नाकय़ावरील उपलब्ध आकडेवारीनूसार निम्याहून जरा जादा ट्रक रस्त्यावर धावत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सध्या चालू असलेला संप असाच चालू राहिला तर येत्या काही दिवसामध्ये व्यापार उद्योगावर यांचे दुरगामी होण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यामधील ट्रक वाहतूक संघटनी सरकारला पत्र लिहून कळवले आहे कि निर्यात न झाल्यास त्याचा परिणाम बाजारपेठावर होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

Related posts: