|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जगाने अनुभवले ‘खग्रास चंद्रग्रहण’

जगाने अनुभवले ‘खग्रास चंद्रग्रहण’ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

या शतकातील सर्वात मोठे आणि अधिक वेळ खग्रास स्थिती असलेले ‘खग्रास चंद्रग्रहण’ शुक्रवारी पार पडलं. रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी चंदग्रहणाला सुरुवात झाली. भारतासह पूर्ण जगभरात हे चंदग्रहण पाहायला मिळाले.

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात, त्यावेळी ग्रहण होते. भारतात देखील हा ‘ब्लड मून’ पाहायला मिळाला आहे. भारतातील सर्व खगोलप्रेमी नागरिकांना या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंदग्रहण पाहता आले. अनेक जागतिक शहरांमध्ये हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

या शतकातील सर्वात मोठय़ा चंद्रग्रहणाच्या काळात हिंदूंची पवित्रभूमी वाराणसीमध्ये सायंकाळी होणारी दैनंदिन गंगा आरतीची परंपरा तुटली आहे. दशाश्वमेध समवेत अन्य घाटांवर शुक्रवारी आरती संध्याकाळऐवजी दिवसाच्या उजेडात करण्यात आली. देश-विदेशातील पर्यटकांसमवेत हजारो लोकांनी यात भाग घेतला.