|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा जैन समाजातर्फे चातुर्मास कलश मिरवणूक

गोवा जैन समाजातर्फे चातुर्मास कलश मिरवणूक 

प्रतिनिधी/ फोंडा

गोवा जैन समाजातर्फे फोंडय़ात प्रथमच परमपूज्य प्रणाम सागर महाराज यांचे चातुर्मास आयोजित करण्यात आले आले. या चातुर्मासची सांगता येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. चातुर्मास उत्सवानिमित्त फोंडा शहरात रविवारी सकाळी 7 वा. चातुर्मास कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दिगंबर जैन समाजाचे भक्तगण व गोमंतकीयांनी भाग घेतला होता. ही मिरवणूक दादा वैद्य चौक येथून सुरु झाली व बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानवर तिची सांगता झाली. पाटणतळी बांदोडा येथे गोवा जैन समाजातर्फे पंचधातूपासून बनविलेल्या कलशाची स्थापन जानेवारी महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती गोवा दिगंबर जैन ट्रस्टचे अध्यक्ष अनिल जेलापुरे यांनी दिली.