|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तारदाळ सन्मती विद्यालयात महामानवांना अभिवादन

तारदाळ सन्मती विद्यालयात महामानवांना अभिवादन 

वार्ताहर /तारदाळ :

श्री बाहुबली विघापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ येथे तीन महामानवांचा संयुक्त समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश चौगुले हे होते. पर्यवेक्षक एस एस पाटील, जेष्ठ अध्यापक एस बी पाटील, एस आर पाटील , वक्तया  ए ए हिंगलजे यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक सुरेश चौगुले यांच्या हस्ते महान व्यक्तींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी एस एस पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यांनी तीन महामानवाच्या जीवनातील अनेक दाखले दिले. यावेळी आकाश जगदाळे, निदा शेख सानवी लोखंडे, पूनम खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

वक्ते ए.ए.हिंगलजे म्हणाले, लोकमान्य टिळक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे व स्व. माणिकचंद भिसीकर यांचे राष्ट्र व समाजाच्या जडणघडणीत  सिंहाचा वाटा आहे.जहाल गटाचे नेते लो. टिळक यांच्या योगदानामुळे  देशाला स्वातंत्र्य लवकर मिळाले . 27 देशात साहित्यातून अजरामर झालेले लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जीवन तरूणांना निश्चित प्रेरणादायी आहे. श्री बाहुबली विघापीठ व आश्रमाच्या जडणघडणीत भिसीकर गुरूजी यांचा सिंहाचा वाटा आहे. सन्मति चे संपादक असणार्या गुरूजींनी संस्थेसाठी आपले जीवन चंदनाप्रमाणे झिजवले.

मुख्याध्यापक चौगुले म्हणाले, समाज व राष्ट्रासाठी जगणारी व्यक्ती ही नेहमी आपल्या कार्यकर्तृत्वाने महान बनते. यासाठी युवकांनी देशाप्रती काहीतरी चांगले व उदात्त करण्याची जिद्द व तळमळ सदैव ठेवावी. सूत्रसंचालन सौ अध्यापिका ए. एम करडे यांनी केले. विकास बरगाले यांनी आभार मानले.

Related posts: