|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » 9 ऑगस्टला सप्तर्षींच्या पुस्तकाचे सिन्हांच्या हस्ते

9 ऑगस्टला सप्तर्षींच्या पुस्तकाचे सिन्हांच्या हस्ते 

ऑनलाईन टीम / पुणे :

युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसऱया आवृत्तीचे प्रकाशन येत्या 9 ऑगस्टला ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी 6 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम होईल. या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रफुल्लता प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहे. 1970 च्या दशकात डॉ. कुमार सप्तर्षी यांना अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरूंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून डॉ. सप्तर्षी यांनी तुरूंगात घेतलेले अनुभव, वाचन, चर्चा आणि त्याचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबतचे लेखन या पुस्तकात आहे. क्रांतीदिन आणि युवक क्रांती दलाच्या 17 व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या पुस्तकाबाबत आपले विचार मांडणार आहेत. या पत्रकार परिषदेदरम्यान सप्तर्षी यांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे भारतीय स्वातंत्र्यलढा आणि गांधीजींच्या कार्याशी संबंधित ठिकाणांना भेट देणाऱया यात्रेची घोषणा केली.