|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कल्याण स्वामींचे साहित्य डिजिटल रूपात

कल्याण स्वामींचे साहित्य डिजिटल रूपात 

समर्थ भक्त शरद कुबेर यांच्या हस्ते प्रकाशन

वार्ताहर/ परळी

समर्थ रामदास स्वामी यांचे अजून ही कित्येक ग्रंथ, साहित्य धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात आहेत. त्यातील काही साहित्य प्रकाशित झाली आहे, तर अजूनही काही ग्रंथ साहित्य प्रकाशित होणे बाकी आहे. या संत साहित्याचा अनमोलसाठा समर्थ वाग्देवता मंदीर येते सुस्थितीत जतन केला असून समर्थ शिष्य कल्याणस्वामी यांचे ही संत साहित्य येथे उपलब्ध आहे. गडावरील समर्थ रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ हे साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

समर्थ भक्त कल्याणस्वामी यांचे साहित्य आजही मार्गदर्शक असून युवा पिढीने त्यांचे वाचन केले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात हे साहित्य युवकांच्या हातात जावे, यासाठी समर्थ भक्त कल्याणस्वामी यांच्या ओव्यांचा संच ‘डिजिटल’ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. युवक व समर्थ भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन समर्थ वाग्देवता मंदिर धुळेचे संचालक शरद कुबेर यांनी केले. कल्याण स्वामींची डोमगाव समाधी, परांडा येथे स. भ. कल्याणस्वामी लिखित 900 ओव्यांचे डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. याचा प्रकाशन नुकताच सोहळा पार पडला. यावेळी परांडा मठाचे अधिपती अविनाश जहागिरदार, विश्वत डॉ. संजय जहागिरदार, श्रीधर पारसनीस यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.

900 ओव्यांचा ‘कल्याण पोथी’ संच

शरद कुबेर पुढे म्हणाले, सध्या समर्थ वाग्देवता मंदिराच्या सहकार्याने कल्याण स्वामींच्या क्रमांक 51 मधीर कल्याण स्वामी लिखीत 900 ओव्यांचा संच ‘कल्याण पोथी’ या नावाने डिजिटलायजेशन करण्यात आला आहे. यावेळी डॉ. जहागिरदार यांनीही मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी विश्वत डॉ. संजय जहागिरदार यांनी शरद कुबेर यांचा सत्कार केला.