|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्राचा वीरपुत्र कोस्तुक राणेंना अखेरचा निरोप;‘शहीद कोस्तुक राणे अमर रहे, भारत माता की जय’

महाराष्ट्राचा वीरपुत्र कोस्तुक राणेंना अखेरचा निरोप;‘शहीद कोस्तुक राणे अमर रहे, भारत माता की जय’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

उत्तर काश्मिरातील गुरेज सेक्टरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर गुरुवारी ठाण्यातील मीरारोड येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सायंकाळीच त्यांचे पार्थिव दिल्लीहून विशेष विमानाने मुंबईत आणले होते. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास हे पार्थिव राणे यांच्या मीरारोड येथील निवासस्थानी आणण्यात आले. तिथे अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यात सहभागी लोकांनी ‘शहीद कोस्तुक राणे अमर रहे, भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.

उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव बुधवारी रात्री दिल्लीहून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. शासनाच्या वतीने मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यात आली.गुरुवारी सकाळी लष्कराच्या वाहनातून त्यांचे पार्थिव मालाडकडे नेण्यात आले. मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यानंतर येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर कौतुभ राणे अमर रहे… अमर रहे.. अशा नागरिकांनी घोषणा दिल्या.शहीद मेजर राणे हे ठाणे जिह्यातील मीरा रोडचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. मेजर राणे मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत.