|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » विदेशातून चलन पाठविण्यात यूएई आघाडीवर

विदेशातून चलन पाठविण्यात यूएई आघाडीवर 

केरळमध्ये सर्वाधिक रक्कम   कौटुंबिक खर्चासाठी जास्त वापर : आरडीए, खासगी बँकांचा हिस्सा सर्वाधिक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विदेशातून भारतात पैसे पाठविण्यात संयुक्त अरब अमिरात (युएई) आघाडीवर पोहोचला. केरळमध्ये सर्वाधिक रक्कम आली, असे 2016-17 या वर्षासाठीच्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हणण्यात आले.

देशात एकूण आलेल्या निधीपैकी संयुक्त अरब अमिरातचा 26.9 टक्के, अमेरिका 22.9 टक्के, सौदी अरेबिया 11.6 टक्के, कतार 6.5 टक्के आणि कुवैतचा हिस्सा 5.5 टक्के आहे. देशात एकूण आलेल्या निधीपैकी 82 टक्के निधी हा युएई, अमेरिका, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान, ब्रिटन आणि मलेशिया या आठ देशांमधून पाठविण्यात आला. राज्यांनुसार वर्गवारी करता केरळमध्ये सर्वाधिक निधी पाठविण्यात आला. पहिल्या पाच राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि दिल्ली यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या चार राज्यांत एकूण निधीपैकी 58.7 टक्के रक्कम आली आहे.

विदेशातून आलेल्या निधीपैकी 59.2 टक्के पैसा कौटुंबिक खर्चासाठी, 20 टक्के बँकांत ठेव आणि 8.3 टक्के निधीचा वापर स्थावर आणि समभाग अशा संपत्तीमध्ये गुंतविण्यात आला. उभरत्या अर्थव्यवस्थांतील  हंगामी अथवा कायमस्वरुपी काम करणाऱया लोकांकडून हा निधी देशात पाठविण्यात येतो.

विदेशातून पैसे पाठविण्यासाठी आरडीए प्रणाली लोकप्रिय असून 75.2 टक्के लोक याचा वापर करतात, 19.5 टक्के लोकांकडून स्विफ्ट, 3.4 टक्के लोक थेट हस्तांतरण, 1.9 टक्के लोक धनादेश व ड्राफ्टचा वापर करतात. या निधीपैकी 74.1 टक्के हिस्सा खासगी बँका, 17.3 टक्के वाटा हा खासगी बँकांचा आहे. 500 डॉलर्सपेक्षा अधिक निधी पाठविण्याचे प्रमाण 70.3 टक्के आहे असे आरबीआयने म्हटले.

Related posts: