|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पुण्यात कॅमेरा दिंडी

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पुण्यात कॅमेरा दिंडी 

ऑनलाईन टीम / पुणे :

जागतिक छायाचित्र दिनी रविवारी 19 ऑगस्ट रोजी पुण्यातील फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनतर्फे कॅमेरा दिंडी व फोटो वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते 11 यावेळेत शनिवारवाडा येथून ही कॅमेरा दिंडी निघणार आहे. यामध्ये मिसेस युनायटेड नेशन श्रद्धा कक्कड प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहे.

कॅमेरा दिंडीचा सकाळी 8 वाजता शनिवारवाडा येथे शुभारंभ होऊन लालमहाल चौक, दगडूशेठ गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, शनिपार चौक, विश्रामबाग वाडा, नु.म.वि. शाळा, प्रभात टॉकिज यामार्गे पुन्हा शनिवारवाडा येथे येऊन समाप्त होईल. तर आदल्या दिवशी शनिवारी 18 ऑगस्ट रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून असोसिएशनतर्फे अलका टॉकिज चौकात सकाळी 9 वाजता, तर बालगंधर्व चौकात वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबतचे सूचना फलक घेऊन प्रबोधन उपक्रम राबविणार आहेत.

Related posts: