|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » केरळमध्ये पावसाचा थैमान ; 24 तासांत 42 जणांचा मृत्यू

केरळमध्ये पावसाचा थैमान ; 24 तासांत 42 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / तिरूवनंतपुरम :

केरळमध्ये पुराने कहर केला आहे. केरळमध्ये विध्वंसक पूर आला आहे. अनेक नद्या कोपल्या असून दरड कोसळण्याच्या घटनांत चोवीस तासांत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात गेल्या 8 दिवसांत मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 113 वर पोहोचली आहे.

पुरामुळे मध्य केरळच्या अनेक भागांत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे उदध्वस्त झाली आहे. कोची विमानतळावर 10 दिवसांपासून पाणी झाले आहे. त्यामुळे विमाने ठप्प आहेत. मुल्ला पेरियारसह राज्यातील सर्व 35 धरणे तुडुंब भरल्यामुळे त्यांची दारे उघडण्यात आली आहेत. पाण्याचा सातत्याने विसर्ग केला जात आहे. रविवारपर्यंत राज्यातील 14 पैकी 12 जिह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे 1.5 लाखाहून अधिक लोकांना तात्पुरत्या निवाऱयात आश्रयाला जावे लागले आहे. स्थानिक सुरक्षा दल, एनडीआरएफ व सैन्याने पाण्यात अडकलेल्या लोकांना बोटेने किंवा एअर हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. अनेक गावांनी पहिल्यांदा पूर पाहिला.छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, आसाम, नागालँड, महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत झालेल्या विविध घटनांत 840 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. छत्तीसगडच्या विजापूरमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भोपालपट्टणसह अनेक भागांत पूरसदृश स्थिती आहे. भोपालपट्टणमध्ये 396.8 मिमी पावसाची नोंद झाली. उत्तराखंडमध्ये अनेक नद्या कोपल्या आहेत. बद्रीनाथ महामार्ग बंद झाला आहे. डेहराडूनला जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत.

Related posts: