|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लैंगिक छळाविरोधात संघटित लढय़ाची गरज

लैंगिक छळाविरोधात संघटित लढय़ाची गरज 

राजश्री साकळे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 कामाच्या ठिकाणी होणाऱया लैंगिक छळाविरोधात संघटीतपणे लढा दिला तरच लैंगिक शोषणाला आळा बसेल असे प्रतिपादन  शरीरबोध संस्थेच्या संचालिका राजश्री साकळे यांनी केले

 महाराष्ट्र बँक कर्मचारी संघटना आयोजित महिला बँक कर्मचाऱयांच्या सातव्या राज्यस्तरीय अधिवेशनात नाशिक येथील स्प्लेन्डर हॉल  मध्ये राजश्री साकळे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी राज्य महिला बँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ललिता जोशी होत्या. श्रीमती साकळे पुढे म्हणाल्या की,आपल्याला काय करायचे आहे किंवा इतरांच्या भानगडीत कशाला पडा असे म्हणत सहकारी महिला कर्मचारी त्रास देणाऱया पुरुषाकडे दुर्लक्ष करतात आणि पीडित महिलेला पाठिंबा देण्याचे टाळतात. यामुळे अत्याचारित स्त्राr एकटी पडण्याचा धोका असतो. गुन्हेगार पुरुषाचेही यामुळे  फावते.  त्या महिलेला आणखीनच त्रास देतो आणि पुढे चालून इतर महिलांचाही तो छळ करू शकतो. असे घडू नये यासाठी कार्यालयातील सर्व महिलांनी एकजूट होऊन पीडित महिलेला संरक्षण देऊन गुन्हेगार पुरुषाला जाब विचारला तर तोच काय पण कार्यालयातील इतर पुरुषही सहकारी महिलांचा लैगिंक छळ करण्यास धजावणार नाहीत. तसेच लैंगिक शोषणाला आळा बसेल.अधिवेशनाचे उदघाटन उल्का महाजन यांनी केले. नेहा देवूलकर यांनी परिचय करून दिला.

 

Related posts: