|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पॅरिस येथे चाकू हल्ला, दोन जणांचा मृत्यू

पॅरिस येथे चाकू हल्ला, दोन जणांचा मृत्यू 

पॅरिस / वृत्तसंस्था :

फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरानजीक एका व्यक्तीने एका धारदार चाकुने लोकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जणांना जीव गमवावा लागल्याची माहिती फ्रान्सच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलिसांनी हल्लेखोराला कंठस्नान घातल्याचा दावा केला आहे.

पॅरिसपासून 30 किलोमीटर अंतरावर गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर इमारतींच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ठार केल्याचे सांगण्यात आले. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु या चाकू हल्ल्यात मारले गेलेले दोघेही हल्लेखोराचे नातलग असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

हल्ल्याचे पीडित आणि त्यांच्या नातलगांसाठी मी प्रार्थना करतो. शौर्य दाखविल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक करत असल्याचे फ्रान्सचे गृहमंत्री गेरार्ड कोलंब यांनी ट्विट करत म्हटले.  हल्ला झालेल्या ठिकाणी पॅरिसमधील सर्वात माठी मुस्लीम वस्ती असल्याचे समजते. या भागातूनच सुमारे 50 हून अधिक स्थानिक लोक इस्लामिक स्टेटमध्ये दाखल होण्यासाठी सीरियात गेले होते.

धमक्यांवर लक्ष देऊ नका

फ्रान्स पोलिसांनी लोकांना अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे. आयएस आता दहशतवादाशी संबंध नसलेल्या घटनांची देखील जबाबदारी स्वीकारत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

Related posts: