|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अटलजींची उणीव देशाला सदैव भासेल

अटलजींची उणीव देशाला सदैव भासेल 

प्रतिनिधी /म्हापसा:

एक कवी, एक लेखक व एक राष्ट्रनेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे देशासाठी खुप मोठे योगदान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठीच अर्पण केले. देशाच्या विकासासाठीच ते सतत झटत राहिले. सर्वसामान्यांना मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी अनेक योजना सुरू केल्या होत्या. पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य देशाच्या इतिहासात अजरामर होईल, असे प्रतिपादन आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हापसा येथे केले.

म्हापसा टॅक्सीस्थानक येथे आयोजित अटलजींच्या अस्थिकलश दर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती डॉ. प्रमोद सावंत, आमदार ग्लेन टिकलो, माजी आमदार किरण कांदोळकर, नगरसेवक संदीप फळारी, तुषार टोपले, कविता आर्लेकर, सुशांत हरमलकर, स्वप्नील शिरोडकर, प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सभापती डॉ. सावंत यावेळी बोलताना म्हणाले की, वाजपेयी यांचे कार्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. उपसभापती मायकल लोबो म्हणाले की, वाजपेयींसारखा नेता पुन्हा होणे कठीण आहे. त्यांनी देशाच्या विकासासाठी सदैव पाऊल उचलेले आहे. भाजप सत्तेवर येण्यास त्यांचा सिहांचा वाटा आहे. त्यांची उणीव सदैव देशाला भासेल, असे ते म्हणाले.

आमदार ग्लेन टिकलो म्हणाले की, वाजपेयी यांचे कार्य देशासाठी महान आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण हा देश सदैव ठेवेल. त्यांच्यासारख्या सेवाभावी निस्वार्थी राजकारण्यांची या देशाला गरज आहे, असे ते म्हणाले. म्हापसाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनीही अटलजींबाबत आपले मनोगत व्यक्त केले. देश एका प्रामाणिक निस्वार्थी राजकारण्याला मुकला अशा शब्दात माजी आमदार किरण कांदोळकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

वाजपेयी यांचा अस्थिकलश पीडीए कॉलनीकडे आल्यानंतर कळंगूट पोलीस स्थानकाजवळ उपसभापती मायकल लोबो यांनी दर्शन घेऊन वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कंळगूट तिटो येथून शिवोली येथे अस्थिकलश आल्यानंतर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. तेथून हा कलश पेडणे येथे गेला. पेडण्यातही सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी वाजपेयींच्या अस्तिकलशाचे दर्शन घेतले. पेडण्यातून हा अस्थिकलश म्हापसा येथे दाखल झाला. टॅक्सीस्थानक येथे तो जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तेथून मग अस्नोडा येथे अस्तिकलश गेल्यानंतर माजी आमदार किरण कांदोळकर यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हा अस्थिकलश डिचोली येथे जाण्यासाठी रवाना झाला.

Related posts: