|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » सलग पाच सप्ताहात उत्तम कामगिरी

सलग पाच सप्ताहात उत्तम कामगिरी 

अमेरिका-चीन चर्चा निष्फळ : गुंतवणूकदारांकडून नफा कमाई

वृत्तसंस्था/ मुंबई

चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार युद्धासंदर्भात सुरू असणाऱया चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष होते. मात्र या चर्चेत कोणताही समाधानकारक मुद्दा उपस्थित न झाल्याने ती व्यर्थ ठरली आहे. सलग तीन सत्रात तेजील आल्याने विक्रमी शिखर गाठल्याने शुक्रवारी घसरण होत बाजार बंद झाला. आंतरराष्ट्रीय संकेतामुळे बाजारात नफा कमाई दिसून आली.

सप्ताहातील शेवटच्या सत्रात घसरण झाली, तर आठवडय़ाच्या कामगिरी बाबतीत सलग पाचव्यांदा बाजार मजबूत झाला. सुरुवातीला बाजारात तेजी आली होती, मात्र अखेरपर्यंत तो कमजोर होत गेला. चालू सप्ताहात सेन्सेक्स 303 आणि निफ्टी 86 अंकाने मजबूत झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 85 आणि निफ्टी 25 अंकाने कमजोर झाला.

अमेरिका आणि चीन यांच्यातील चर्चेमुळे बाजारात नफा कमाई दिसून आली. रुपया कमजोर होत असून तेलाच्या किमती वाढत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या होणाऱया बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे आणि व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे गिओजित फायनान्शियलचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

 सेन्सेक्समध्ये येस बँक 3.52 टक्के आणि हीरो मोटो 2.08 टक्क्यांनी घसरले. रुची सोयाचा समभाग 4.90 टक्क्यांनी घसरला. बेरिंग पीई एशियाकडून भागविक्री होणार असल्याने हेक्सावेयर टेक्नोलॉजीचा समभाग 13.30 टक्क्यांनी कमजोर झाला.  वेदान्ता, टाटा स्टील, ओएनजीसी, ऍक्सिस बँक, विप्रो, रिलायन्स इन्डस्ट्रीज, कोल इंडिया, भारती एअरटेल यांच्यात तेजी आली.

निर्देशांकाची कामगिरी

धातू, आरोग्यसेवा, पॉवर, रिअल्टी, तेल आणि वायू निर्देशांकांत तेजी आली. बँकेन्स निर्देशांक 0.80 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू 0.79 टक्के, एफएमसीजी 0.62 टक्के, आयटी 0.60 टक्के, वाहन 0.46 टक्के आणि भांडवली वस्तू निर्देशांक 0.25 टक्क्यांनी कमजोर झाला.

Related posts: