|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडियाच्या हस्तक्षेपाला परवानगी नाही : रविशंकर प्रसाद

निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडियाच्या हस्तक्षेपाला परवानगी नाही : रविशंकर प्रसाद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा दुरुपयोग करीत निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे प्रकार समोर येत आहेत. याची भारताने गंभीर दखल घेतली असून अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मना किंवा तत्सम गोष्टींना कधीही परवानगी मिळणार नाही, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

अर्जेंटिनातील सलटा येथील जी-२० डिजिटल इकॉनॉमी मिनिस्ट्रिअलच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतातील लोकशाही प्रक्रियेच्या शुद्धतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच भारताच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये अडथळे आणणाऱ्यांना कडक शासन केले जाईल, असे मी वचन देतो.

प्रसाद पुढे म्हणाले, सोशल मीडियातील माहितीचा निवडणूक प्रक्रियेमध्ये दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले असून भारताने याला गांभीर्याने घेतले आहे. त्याचबरोबर अशा सोशल मीडियातील माध्यमांना कधीही परवानगी दिली जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे याचा असा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.