|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » उद्योग » जून तिमाहीत एफडीआयमध्ये 23 टक्क्यांनी वाढ

जून तिमाहीत एफडीआयमध्ये 23 टक्क्यांनी वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एप्रिल-जून तिमाहीदरम्यान विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये 23 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. गेल्या तिमाहीत ती 12.75 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे सरकारी आकडेवारीतून समजते. जून 2017-18 कालावधीत 10.4 अब्ज डॉलर्सची एफडीआय देशात आल्याचे औद्योगिक धोरण आणि प्रमोशन विभागाच्या आकडेवारीतून समजते.

गेल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक सेवा क्षेत्रात करण्यात आली. या क्षेत्रात एकूण 2.43 अब्ज डॉलर्स, ट्रेडिंग (1.62 अब्ज डॉलर्स), दूरसंचार (1.59 अब्ज डॉलर्स), संगणकीय सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर (1.4 अब्ज डॉलर्स), पॉवर क्षेत्रात 969 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक आली. सर्वाधिक गुंतवणूक करणाऱया देशांमध्ये सिंगापूर (6.52 अब्ज डॉलर्स), मॉरिशस (1.5 अब्ज डॉलर्स), जपान (874 दशलक्ष डॉलर्स), नेदरर्लंड्स (836 दशलक्ष डॉलर्स), ब्रिटनमधून 648 दशलक्ष डॉलर्स आणि अमेरिकेतून 348 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. सध्या देशाची व्यापारी तूट आणि चालू खाते तूट वाढत असताना एफडीआय वाढत असल्याने अर्थव्यवस्थेसाठी समाधानकारक बाब आहे.