|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लालबहादूर शास्त्राrजी चौकात गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ

लालबहादूर शास्त्राrजी चौकात गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ 

बेळगाव :

जालगार गल्ली येथील लालबहादूर शास्त्राrजी चौकात सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळाची मुहूर्तमेढ मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गिंडे यांच्या हस्ते रोवण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव ही सामाजिक बंधूभाव जोपासनेची आणि संघटित होण्यासाठी संधी आहे. ही शिकवण लोकमान्य टिळकांनी दिली. त्याचे आचरण आपण साऱयांनी करावे, असे प्रतिपादन संजय गोपाळ नाईक यांनी केले.

गणेशोत्सवासारख्या माध्यमातून सामाजिक हिताचे उपक्रम राबविण्याचे कार्य मंडळाने करावे, असे मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे माजी कार्याध्यक्ष सुनील जाधव यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.

यावषी हे मंडळ सुवर्ण महोत्सवानिमित्त मोठय़ा थाटामाटात विविध सामाजिक उपक्रमांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार आहे. तरी ज्या गणेशभक्तांना गणहोम आणि महाप्रसादासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी मंडळाचे खजिनदार संजीव नाईक यांच्याशी मो. क्र. 8971175999 वर संपर्क साधावा.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद, जोतिबा परीट, प्रदीप किल्लेकर, अरविंद गिंडे, सतीश चौगुले, सुधीर गिंडे, रवींद्र टोपाजीचे, अमोल गिंडे, संदीप किल्लेकर, राजू गिंडे, रोहन पवार यासह असंख्य गणेशभक्त उपस्थित होते.