|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अनुसुचित जमाती विकास महामंडळच्या वेबसाईटचे मंत्री गावडे यांच्या हस्ते उद्घाटन

अनुसुचित जमाती विकास महामंडळच्या वेबसाईटचे मंत्री गावडे यांच्या हस्ते उद्घाटन 

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा राज्य अनुसुचित जमाती विकास महामंडळाच्या संकेतस्थळाचे stcorporation.goa.gov.in) काल उद्घाटन आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील अनुसुचित जमातीचा लोकांना या महामंडळातर्फे मिळणाऱया योजनांची माहिती आता घर बसल्या मिळणार आहे. या हेतूने या महामंडळातर्फे या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

 राज्यात मोठय़ा प्रमाणात अनुसुचित जमातीचे लोक राहतात त्यांच्यासाठी या महामंडळातर्फे विविध योजना पुरविल्या जातात पण काणकोण सत्तरीसारख्या भागातील लोकांना प्रत्येक वेळी पणजीत यायला मिळत नाही त्यामुळे आता हे लोक आपल्या योजनेसाठी घर बसून अर्ज पाठवू शकतात. तसेच या योजनेविषयी माहिती या वेबसाईटवरुन घेऊ शकतात. यामुळे आता या महामंडळाची सेवा सुरळीत होणार आहे. सगळय़ांना याचा फायदा होणार आहे, असे गोविंद गावडे यांनी सांगितले.

 आदिवासी कल्याण मंत्री या नात्याने मी राज्यातील सर्व आदिवासी समाजाच्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. ज्या लोकांना काही आर्थिक मदत हवी असेल किंवा आणी काही अडी अडचणी असेल तर या महामंडळातर्पे पूर्ण केल्या जातात यासाठी अनेक योजना आहे त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले.

 या महामंडळातर्फे अनुसुचित जमातीसाठी विविध योजना पुरविल्या जात आहे. याचा लाभ राज्यातील अनेक मागासवर्गीय लोक घेत आहेत. आता या वेबसाईटमुळे त्यांना अनेक योजनांची माहिती घर बसल्या पहायला मिळणार आह,s असे यावेळी या महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी सांगितले. या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिक संध्या कामत यांनी मान्यवरांचे आभार मानले.