|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्पेस फोर्सला ’आयर्न मॅन’ने प्रत्युत्तर

स्पेस फोर्सला ’आयर्न मॅन’ने प्रत्युत्तर 

मॉस्को / वृत्तसंस्था :

भविष्यातील युद्धाच्या दृष्टीने अमेरिका एका बाजूला स्पेस फोर्स (अंतराळ दल) उभे करत असून तर रशियाने ‘रोबोकॉप’ आर्मीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. रशियाने रोबोकॉप एक्सो-स्केलिटन कवचाची चाचणी देखील सुरू केली आहे. अलिकडेच प्रदर्शित स्वतःच्या या सुपर सोल्जर स्केलिटनबद्दल रशियाने हे चिलखती आवरण परिधान करणाऱया कमांडोचे बळ सामान्य सैनिकापेक्षा अनेक पटीने वाढणार असल्याचा दावा केला आहे.

एका हाताने चालविणार मशीनगन

मेल ऑनलाईनच्या अहवालानुसार हा सूट पूर्णपणे ‘स्टार वॉर्स’ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या सैनिकांप्रमाणे भासतो. या प्रोटोटाइप मिलिट्री एक्सो-स्केलिटनमुळे पायी चालणारा सैनिक एका हाताने मशीनगन चालवू शकेल तसेच त्याचा नेम संगणकाप्रमाणे अचूक असेल असेही रशियाने म्हटले आहे.

भविष्यातील सैनिकाचा वेश

हा सूट परिधान करून सैनिक अवजड सामग्री देखील उचलू शकतो, तसेच सर्वसाधारण वेगापेक्षा अधिक वेगाने पळू शकणार आहे. रशियाच्या संरक्षण विषयक कंपनीने ‘भविष्यातील सैनिका’चा हा सूट तयार केला असून जो मॉस्को येथे आयोजित इंटरनॅशनल मिलिट्री अँड टेक्निकल फोरममध्ये सादर करण्यात आला आहे.

गोळय़ा देखील ठरणार निष्प्रभ

टायटॅनियमने तयार झालेल्या या सूटची रचना परिधान करणाऱयाचे बळ आणि क्षमता वाढेल यादृष्टीने करण्यात आली आहे. हा सूट परिधान करणाऱया कमांडोवर कोणतीही गोळी किंवा बॉम्बच्या छऱयांचा कसलाच प्रभाव पडणार नाही. 2025 पर्यंत युद्धमैदानासाठी हा सूट तयार असेल, सध्या बॅटरीबद्दल तांत्रिक समस्या असल्याचे रशियन कंपनीने सांगितले.