|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिका सभेस उशीरा आल्याने महापौरांची झाली आरती

महापालिका सभेस उशीरा आल्याने महापौरांची झाली आरती 

प्रतिनिधी /सोलापूर :

पालिकेच्या सभेला अतिविलंब होत असल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी करीत महापौर यांच्या खूर्ची बरोबरच खुद्द महापौर यांची आरती केली. दरम्यान या सभेत नगरसेवकांनी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना उभे राहून उत्तर देण्याची सूचना केली असता, सर्व अधिकारी यांनी सभेवर बहिष्कार टाकल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या सभेत पहायला मिळाली. ही सभा विविध मुद्यांवरून वादळी अशीच ठरली.

  महानगरपालिकेची ऑगस्टची तहकूब सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. चार वाजता आयोजित केलेली ही सभा साडेपाच वाजले तरीही महापौरांसह कुणीही सत्ताधारी पदाधिकारी सभागृहात हजर राहिले नाहीत. सभा सुरू होण्यास विलंब होत असल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा व एमआयएमच्या नगरसेविकांनी आक्रमक भूमिका घेत सभाग्रहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वाटाघाटी झाले असतील तर महापौर ताई बाहेर या’, ’शहरातील रस्ते करा’ आदी घोषणांनी सभागृहात  परिसर दणाणून सोडले. त्यानंतर सभागृहाबाहेर पायरीवर बसून पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बनशेट्टी यांच्या नामफलक व रिकाम्या खुर्चीला हळदी कुंकू लावून आरती करण्यात आली. महापौर कार्यालयातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  दरम्यान, त्यानंतर विरोधी पक्षांच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे,  फिरदोस पटेल, सुनिता रोटे, परवीन इनामदार, ज्योती बमगुंडे, स्वाती आवळे यांच्यासह नगरसेविकांनी पुन्हा आपला मोर्चा सभाग्रहकडे वळविला.

  साडेपाचच्या सुमारास अखेर महापौरांसह अधिकाऱयांचे आगमन सभागृहात  झाले. सभागृहात प्रवेश करताच विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी महापौर बनशेट्टी यांची हळदी कुंकू लावून आरती केली. सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची तीव्र घोषणाबाजी सुरू असतानाच महापौर अँटिचेंबरमध्ये गटनेत्यांची बैठक सुरू होती. नगरसेविका बाहेरच आंदोलन करताना अँटिचेंबरमध्ये गटनेत्यांची महापौर यांच्यासमवेत चर्चा सुरू असल्याची कॉमेंट्स श्रीनिवास करली यांनी केली. तर सभागृहात येताना बसपाच्या नगरसेविकांना बसण्याची सूचना केली. कोणीही आंदोलन करताना सहभागी होऊ नका असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: