|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण

डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण सुरूच असल्याचे पहायला मिळाले बाजार सुरू होताच रूपयाने प्रति डॉलर 71 रूपये असा निचांक गाठला आहे. त्यानंतर काही वेळताच 9 पैशांनी सावरून रूपयाचे मूल्य 70 रूपये 91 पैशांवर स्थिरावले . यंदाच्या वर्षात रूपयांचे मूल्य 10 टक्क्यांनी घसरले असून अशियातील अन्य चालनांच्या तुलनेत ही सर्वात स्थिती आहे.

डॉलरच्या मागणीत झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किंमतींचा हा परिणाम गेल्या काही दिवसांपासून रूपयाच्या किंमतीवर दिसून येत आहे. गुरूवारी रूपयाची 15 पैशाने घसरण होऊन तो 70.74 पर्यंत घसरला होता. त्यात आज आणखी भर पडली, संपूर्ण ऑगस्ट महिन्या रूपयाची 3.30 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.