|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तरुण सागर महाराज यांची प्रकृती अत्यवस्थ

तरुण सागर महाराज यांची प्रकृती अत्यवस्थ 

नवी दिल्ली

प्रसिद्ध जैन धर्मगुरु तरुण सागर महाराज यांची प्रकृती सध्या अत्यवस्थ आहे. त्यांना कावीळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणाच होत नसल्याचे समजते. त्यांनी उपचार थांबवून चातुर्मासस्थळी जाण्याचा निर्णय घेतला होता. तरुण सागर आता आपल्या अनुयायांसोबत दिल्लीतील कृष्णानगर येथील राधापुरी जैन मंदिर चातुर्मासस्थळी असल्याने दिल्ली परिसरातील बहुतेक सर्व जैन साधूंनी तरुण सागर यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी चातुर्मासस्थळी धाव घेतली आहे. सध्या तरुण सागर हे पुष्पदंत सागर महाराजांच्या परवानगीने ‘संथारा’ (जैन धर्मानुसार अन्न-पाण्याचा त्याग करणे) घेत होते. मात्र, प्रकृती अधिकच ढासळल्याने त्यांना पुन्हा इस्पितळात हलविण्यात आले. जैन मुनी तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांना क्रांतिकारी संत असेही संबोधले जाते. कडवे प्रवचन नावाची त्यांची पुस्तिकाही प्रसिद्ध आहे.