|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजच्या सभापती जयश्री तेली यांचा राजीनामा

गडहिंग्लजच्या सभापती जयश्री तेली यांचा राजीनामा 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री तेली यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिवदास यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्यावर 10 पैकी 7 सदस्यांनी अविश्वास दाखल केला असून येत्या सोमवारी यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा होत आहे.

सभापती सौ. तेली यांच्यावर 10 पैकी 7 सदस्यांनी वेगवेगळी कारणे देत अविश्वास ठराव दाखल केला आहे. यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी गडहिंग्लज पंचायत समिती सभागृहात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होत आहे. अविश्वास ठराव रोखण्यासाठी शुक्रवारी भाजपाच्या नेते मंडळींनी जोरकस प्रयत्न केले पण त्याला यश आले नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजीनामा देवून सौ. तेली या मोकळय़ा झाल्या आहेत. सभापतींनी राजीनामा दिल्याने सोमवारच्या विशेष सभेकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. राजीनामा देताना भाजपा तालुकाध्यक्ष हेमंत कोलेकर, पं. स. सदस्य प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, संतोष तेली आदी उपस्थित होते.

सोमवारची सभा यशस्वी करत विरोधी ताराराणी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेच्या सदस्यांनी एकत्र रहात पुढचा कारभार करण्याचे ठरवल्याची चर्चा पंचायत समिती वर्तुळात होत आहे. आता सभापती पदावर ताराराणी आघाडीचे विजयराव पाटील आणि उपसभापती पदावर काँग्रेसचे विद्याधर गुरबे यांना संधी देण्याचा निर्णय नव्या आघाडीने घेतला आहे. त्यामुळे सोमवार आणि त्यानंतरच्या राजकीय हालचालीकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे

Related posts: