|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माण – खटावमध्ये आज जयकुमार गोरेंचे शक्तीप्रदर्शन

माण – खटावमध्ये आज जयकुमार गोरेंचे शक्तीप्रदर्शन 

जनसंघर्ष यात्रेद्वारे कॉंग्रेसचे भाजपा सरकारविरोधात रणशिंग

वार्ताहर/ खटाव

राष्ट्रीय कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज माण आणि खटाव तालुक्यात येत आहे. दोन्ही तालुक्यात यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र कॉंग्रेसमय वातावरण तयार झाल्याने कार्यकर्ते भलतेच चार्ज झाले आहेत. वडूज आणि दहीवडी येथे होणाया यात्रेच्या स्वागताची तसेच म्हसवड येथील जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. आ. जयकुमार गोरे जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने ब्रयाच दिवसांनी शक्तीप्रदर्शन करणार असल्याने दोन्ही तालुक्यांची उत्कंठा वाढली आहे.

भाजपा सरकारच्या निषक्रिय कारभाराविरोधात महाराष्ट्र  प्रदेश कॉंग्रेसने सुरु केलेली जनसंघर्ष यात्रा आज जिह्यातील माण आणि खटाव तालुक्यात येत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून विधानसभेच्या या मतदारसंघावर कॉंग्रेसच्या आमदार जयकुमार गोरेंचे पूर्ण वर्चस्व आहे. मतदारसंघाचा चाळीस वर्षांचा विकासकामांचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी कॉंग्रेसच्या माध्यमातून आ. गोरेंचे यशस्वी प्रयत्न सुरु असल्याने जनतेचीही त्यांना मोठी साथ मिळत आहे. माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर तर आ. गोरेंनी न भूतो न भविष्यती प्रयत्न केल्याने जनतेने त्यांना जलनायक अशी उपाधी दिली आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात आ. गोरेंच्या पाठपुराव्याने पाणीयोजनांची अनेक कामे मार्गी लागली आहेत. राज्यभर आदर्श ठरलेल्या साखळी सिंमेंट बंधायांची संकल्पना याच मतदारसंघातून पुढे आली होती. आघाडीच्या काळात रात्रंदिवस परिश्रम घेऊन आ. गोरेंनी दोन्ही तालुक्यांत कोटय़वधींचा निधी खर्चून  शेकडो सिमेंट बंधायांची साखळी उभारल्याने टंचाईची तीव्रता कमी करण्यात यश आले होते. गावोगावी रस्त्यांचे जाळे तयार करण्यापासून वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजा वाडय़ावस्त्यांपर्यंत पोहचविण्यात आ. गोरेंना यश आले. आजपर्यंत जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेली जीवापाड मेहनत जनतेने पाहिली आहे. 

गेल्या साडेतीन चार वर्षांत राज्यात तसेच केंद्रात सत्तेत असलेले  भाजपा सरकार सर्वच आघाडय़ांवर निक्रिय ठरले असल्याने जनतेचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. आज ही यात्रा आ. जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात येत आहे. जीवघेणी महागाई थांबली पाहिजे, घोटाळे नको सुशासन हवे आहे, तानाशाही नको लोकशाही हवी, बळीराजाच्या कष्टाला सन्मान, महिलांना सुरक्षा आणि बेरोजगारांना रोजगार पाहिजे आणि म्हणूनच पुन्हा कॉंग्रेसचेच सरकार पाहिजे अशा टॅगलाईन घेऊन पक्षाचे राज्यातील सर्व वरिष्ठ जनतेत जागृती करायला निघाले आहेत. माण आणि खटाव तालुक्यातील  आ. जयकुमार गोरेंच्या सर्वच कार्यक्रमांची जिल्हाभर सांगोपांग चर्चा होते. आत तर ब्रयाच दिवसांनी ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. सध्या भाजपा सरकरच्या चुकीच्या धोरणांचे एक एक कारनामे बाहेर पडायला लागले आहेत. आ. गोरे सुरुवातीपासूनच भाजपाच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका करत आले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर माण आणि खटावमध्ये येणारी संघर्षयात्रा कॉंग्रेसच्या  कार्यकर्त्यांना चांगलीच चार्ज करणार आहे. गावोगावच्या कार्यकर्ते आणि जनतेच्या कटाक्षाने संपर्कात रहाणाया आ. गोरेंनी आजच्या यात्रेवरही चांगलेच लक्ष ठेवले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार aसल्याने विधानसभेला आ. गोरेंना भाजपाकडूनच आव्हान मिळणार आहे, त्यामुळे आजच्या म्हसवड येथील सभेकडे दोन्ही तालुक्यांसह जिह्याचे लक्ष लागले आहे.

Related posts: