|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » उद्योग जगतातील नवतंत्रज्ञानावर पुण्यात राष्ट्रीय परिषद

उद्योग जगतातील नवतंत्रज्ञानावर पुण्यात राष्ट्रीय परिषद 

ऑनलाईन टीम / पुणे

  • ‘महेश इंडस्ट्रीयल ग्रुपतर्फे आयोजन, तज्ञांचे मागदर्शन

 

महेश इंडस्ट्रीअल ग्रुपतर्फे शनिवारी कोरेगाव पार्क येथील वेस्टीन हॉटेलमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादन क्षेत्रात सध्या मूलगामी बदल होत आहेत. बिग डेटा, आयआयओटी, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनसारख्या तंत्रज्ञानामुळे व्यवसायात देखील बदल होत आहेत. डेटा-आधरित नवकल्पनांसह उद्योगजगताची वाटचाल पुढे चालू राहण्यासाठी इंडस्ट्री 4.0 या राष्ट्रीय परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी उद्योग जगतातील विविध क्षेत्रातील तज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. इंडस्ट्री 4.0 वरील पुण्यात होणारी ही सर्वात मोठी परिषद असणार आहे, अशी माहिती महेश इंडस्ट्रीअल ग्रुपचे सचिव मनोज झंवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेमध्ये स्टीअरींग कमिटी ऑफ सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 चे सदस्य आणि उद्योजक दत्तात्रय नवलगुंदकर, इंडिया बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी माहेश्वरी, आयआयटी भिलईचे संचालक रजत मूना, एसएपीचे संचालक गिरीकांत अवधनुला आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेला विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्राचार्य सिद्धार्थ जबडे यांनी सहकार्य केले आहे. तर, सियान हेल्थ केअर यांनी विशेष सहकार्य केले असून आयसीआयसीआय बँक, यासाकावा, एलीमेंटस प्रीफॅब, महेश सहकारी बँक, कीट्रॉनीक्स यांनी सहाय्य केले आहे. यावेळी रोबोटचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. परिषदेमध्ये एसएमई व्यवसाय संधी, सायबर वर्ल्डच्या धमक्मया आणि आव्हाने, एसएमईसाठी प्रभावी उत्पादन आणि व्यवस्थापन यासाठीचा बिग डाटा, रोबोटिक्स व ऑटोमेशनवर गुंतवणूक परतावा, एआर आणि व्हीआर वापरून सिम्युलेशन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना या परिषदेचा लाभ घेता यावा, याकरीता 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी महेश इंडस्ट्रीअल ग्रुपचे अध्यक्ष राहुल धुत, उपाध्यक्ष आनंद करवा, सदस्य राहुल मोहता व सियान हेल्थ केअरचे कार्यकारी अधिकारी दिनेश चांडक उपस्थित होते.

Related posts: