|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » चक्रीवादळानंतर भूकंपाचा जपानला तडाखा, 2 ठार

चक्रीवादळानंतर भूकंपाचा जपानला तडाखा, 2 ठार 

होक्काइदो :

जपानमध्ये चक्रीवादळाने नुकसान घडवून आणल्यानंतर गुरुवारी सकाळी 6.7 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे होक्काइडो येथे दोन जणांचा मृत्यू झाला तर 32 जण बेपत्ता झाल्याचे समजते. परंतु या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

भूकंपानंतर भूस्खलनामुळे अनेक घरांना नुकसान पोहोचले असून कित्येक जण जखमी झाले आहेत. जपानच्या अनेक भागांमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. होक्काइडो भागातील मेट्रो सेवा देखील प्रभावित झाली. भूकंपामुळे होक्काइडो आणि न्यू चिटोस विमानतळाला देखील नुकसान पोहोचले. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागानुसार भूकंपाचे केंद्र होक्काइडोचे मुख्य शहर सप्पोरोपासून 68 किलोमीटर अंतरावर होते.

सरकारने मदत तसेच बचावकार्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. लोकांना वाचविण्यास सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी सांगितले. मदतकार्यासाठी होक्काइडो गव्हर्नरांच्या आवाहनानुसार स्वसंरक्षण दलाचे 25 हजार जवान पाठविले जाणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

Related posts: