|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माध्यमिक शाळा समस्येवर चर्चा करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक

माध्यमिक शाळा समस्येवर चर्चा करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक 

प्रतिनिधी /विटा :

माध्यमिक शिक्षण विभागातील शाळा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यावर धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहेत. त्यासाठी राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी वेळ मिळावा, अशी मागणी राज्याध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. त्यावर मंत्री तावडे यांनी पुढील दोन आठवडय़ात याबाबत अधिकारी, मंत्री आणि महामंडळ प्रतिनिधी यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

शिक्षक दिनानिमित्त सातारा येथे आयोजित राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने आलेल्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी भेट घेतली. राज्याध्यक्ष गायकवाड यांनी माध्यमिक शाळा आणि शिक्षणाच्या प्रश्नांकडे मंत्री तावडे यांचे लक्ष वेधले. यावेळी मंत्री तावडे यांनी शिष्टमंडळाला वरील आश्वासन दिले.

याबाबत महामंडळ अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी दिलेली माहिती अशी, माध्यमिक शाळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. संच मान्यता देताना पटसंख्या कमी असेल, तर शिक्षक संख्या कमी होते. परंतु पुन्हा विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर शिक्षक संख्या वाढली जात नाही. त्याचा परिणाम शाळेच्या कामकाजावर होतो. सन 2013 नंतर अतिरिक्त शिक्षकांचा फुगवटा दिसतो. शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद असल्यामुळे अनेक शाळांतून लिपिक, शिपाई पदे रिक्त आहेत. ही बंदी उठवून याबाबत समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

Related posts: