|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » मोदी-अंबानींमधील राफेल कनेक्शनची चौकशी व्हावी

मोदी-अंबानींमधील राफेल कनेक्शनची चौकशी व्हावी 

ऑनलाईन टीम / पुणे

संरक्षण मंत्रालयाकडून विमान खरेदीची कोणतीही प्रक्रिया न राबविता आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदीचा 60 हजार कोटींचा करार केला असून, या खरेदीत शंकास्पद असे बरेच काही दिसत आहे. खरेदीपूर्वी पंतप्रधान नरेंद मोदी व उद्योगपती अंबानी यांच्यात एक बैठक झाली असून, डील करताना सर्व कायदेशीर संसदीय प्रक्रिया टाळल्या गेल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, काँग्रेसच्या विविध आघाडय़ांचे प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

रेड्डी म्हणाले, राफेल खरेदीआधीची ती गुप्त बैठक व त्यानंतर झालेले डील संशयास्पद आहे. फक्त बारा दिवस आधी एक कंपनी स्थापन होते व या खरेदी व्यवहारात सहभागी होते. विमानांची पूर्वी निश्चित केलेली किंमत काही पटींनी वाढते. 136 विमाने घ्यायची असताना 36 विमाने घेतली जातात. ज्यांना विमाने द्यायची आहेत ती कंपनी मध्यस्थीसाठी बारा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीचा आग्रह धरते. हे सगळेच शंकास्पद आहे. हवाईदलाला विश्वासात न घेता 526 कोटी 10 लाख रूपयांप्रमाणे 18 हजार कोटी रूपये ही किंमत होते. परंतु, 60 हजार कोटींमध्ये केवळ 26 विमाने खरेदी कशी काय होतात? उर्वरित विमाने कोणाकडून खरेदी करणार, याची माहिती देशापुढे येण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संयुक्त समितीद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

Related posts: