|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऐतिहासिक रंकाळा तलावला ब्ल्यू ऍलगीचा धोका

ऐतिहासिक रंकाळा तलावला ब्ल्यू ऍलगीचा धोका 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ऐतिहासिक रंकाळा तलावात ब्ल्यू ऍलगीचा धोका वाढला आहे. तलावातील पाणी हिरवे झाले आहे. पर्याटकांची गर्दी होत असताना तलावातील पाण्याचा रंग पाहून नाराजी व्य़क्त करत आहे. तसेच येणाऱया गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे गणेश विसर्जन कुंडालाही शेवळय़ाचा थर साचलेला दिसत आहे. महापालिकेकडून मात्र, कोणतीच कारवाई होत नाही.

गेल्या महिन्यांपासून तलवाची ही परिस्थिती आहे. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पर्यावरण विभाग प्रमुखांकडे तलावातील हिरव्या तवंगाबाबत अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावरुन महापालिकेचा कारभार फक्त कागदोपत्री सुरु असून कार्यवाही मात्र शुन्य आहे, अशी परिस्थिती आहे. पर्यावरणवादी, निसर्ग प्रेमी रंकाळा प्रेमी यांच्यात महापालिकेच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहे. हिरव्या पाण्यामुळे तलावात असणाऱया जलचर प्राण्यावर याचा परिणाम होत आहे. तसेच तलावच्या ठिकाणी मोठया प्रमाणात पक्षी येत आहेत. मात्र या पाण्यामुळे त्यांचाही जीव धोक्यात आला आहे. तलावामध्ये मोठया प्रमाण प्लास्टिक कचराही टाकण्यात आला आहे. निर्माल्य तलावात टाकू नये, असे आदेश असतानाही याची अंमलबजावणी होताना दिसून येत आहे.

Related posts: