|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कॉलेज युवतीची वरवडेत गळफासाने आत्महत्या

कॉलेज युवतीची वरवडेत गळफासाने आत्महत्या 

कणकवली:

वरवडे-फणसवाडी येथील तन्वी संजय कदम (17) या महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

वरवडे-फणसवाडी येथे संजय कदम यांचे दुमजली घर आहे. तन्वी ही बारावीमध्ये शिकत होती. गुरुवारी सकाळी तिने कुटुंबातील काहींसोबत नाश्ता केला. त्यानंतर ती वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेली. बराच वेळ होऊन गेला तरी ती खाली न आल्याने आईने वरच्या मजल्यावर जाऊन खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.

तन्वी हिने सिलिंग पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. तिला तत्काळ उपजिल्हा रुग्णायात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासणी केली असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती समजताच पोलीसही दाखल झाले होते. याची खबर राजेश चंद्रकांत कदम (37, वरवडे – फणसवाडी) यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस राठोड करीत आहेत. तन्वी हिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.