|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सौदी अरेबियाच्या महिलांना वैमानिक होण्याची संधी

सौदी अरेबियाच्या महिलांना वैमानिक होण्याची संधी 

रियाध  

सौदी अरेबियात पहिल्यांदाच महिलांसाठी वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंट यासारख्या नोकऱयांसाठी भरती मोहीम राबविली जाणार आहे. रियाधच्या फ्लायनास एअरलाइनने विमानोड्डाण क्षेत्रातील महिलांचे योगदान वाढविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. भरतीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या 24 तासातच देशभरातील 1 हजाराहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. सौदीत सुरू असलेल्या सुधारणांमध्ये महिलांना देखील महत्त्वाचा भागीदार करण्याची कंपनीची इच्छा आहे. एअरलाइन्सच्या यशात महिलांचा महत्त्वाचा वाटा असतो, असे फ्लायनासच्या प्रवक्त्याने सांगितले.

युवराज सलमान हे व्हिजन 2030 अंतर्गत सौदी अरेबियाला तेल-वायू आणि हज यात्रेपासून मिळणाऱया उत्पन्नावरील निर्भरतेपासून मुक्त करू इच्छितात. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला वैविध्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी निर्मिती तसेच सेवा क्षेत्राला चालना देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

Related posts: