|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » कर्नाटकमध्ये पेट्रोल-डिझेल 2रूपयांनी स्वस्त

कर्नाटकमध्ये पेट्रोल-डिझेल 2रूपयांनी स्वस्त 

ऑनलाईन टीम / बंगळुरू :

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसोंदिवस वाढ होत असतानाच कर्नाटक सरकारने तेथील सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक निर्णय दिला आहे. राजस्थान, आंध्रप्रदेशनंतर आता कर्नाटकातपेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी दोन रुपयाने कपात केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त करत असल्याची घोषणा केली.

काँग्रेसने भाजपावर इंधन दरवाढीवरून हल्ला चढवला आहे. ’आमच्या सरकारने राज्यात इंधनाचे दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आज मोदींचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी ही वाढदिवसाची भेट आहे’, असा टोला लगावतानाच ’जर राज्य सरकार इंधन दर कमी करू शकते तर केंद्र सरकार इंधन दरात कपात का करत नाही?,’ असा सवाल काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी केला.

 

Related posts: