|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » दरोडेखोरांच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

दरोडेखोरांच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी 

पुणे / प्रतिनिधी

लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी पहाटे दोन वाजता एका घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी चढविलेल्या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी अत्यवस्थ असून, पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

लोणीकंद परिसरातील डोंगरागाव येथील गडदे वस्तीत ही घटना घडली. केरबा भिवा गडदे (वय 62, रा. डोंगरागाव) असे मृत्यू पावलेल्या ज्ये÷ नागरिकाचे नाव आहे. तर मुक्ताबाई केरबा गडदे (वय 61) या गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त अधीक्षक व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पाहणी केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला आहे. याबाबत केरबा गडदे यांची सून निर्मला अशोक गडदे (वय 30, रा. गडदे वस्ती, डोंगरागाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत लोणीकंद पोलीस म्हणाले, डोंगरागाव ही आडबाजूला वस्ती आहे. गडदे हे आपल्या पत्नीसह आपल्या घरात सोमवारी रात्री झोपले होते. तर दुसऱया खोलीत त्यांची सून झोपली होती. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तिघा चोरटय़ांनी अचानक गडदे यांच्या घरात शिरून हल्ला केला. त्यांनी केलेल्या मारहाणीत केरबा गडदे यांचा जागीच मृत्यू झाला. चोरटय़ांनी मुक्ताबाई यांच्या गळय़ातील मंगळसूत्र व नाकातील नथ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी विरोध केल्याने चोरटय़ांनी त्यांच्या डोक्मयात मारले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

Related posts: